esakal | देशातील खरिपाच्या पेरणीत घट; नगदी पिकांकडे वाढतोय कल
sakal

बोलून बातमी शोधा

kharip Sowing

देशातील खरिपाच्या पेरणीत घट; नगदी पिकांकडे वाढतोय कल

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : देशात यंदाच्या खरीप हंगामात गेल्या वर्षीपेक्षा १२ लाख ५१ हजार हेक्टरने कमी पेरणी झाली आहे. कपाशी, बाजरी, भुईमुगाचे क्षेत्र घटले असले, तरीही भात, मका, डाळी, सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. दुसरीकडे मात्र ज्वारीची पेरणी गेल्या वर्षीइतक्या १४ लाख ७५ हजार हेक्टवर झाली आहे. अन्नधान्याचा विचार करता, अजूनही गेल्या वर्षीपेक्षा चार लाख हेक्टरवर पेरण्या कमी झाल्या आहेत.

अशा झाल्यात देशात पेरण्या...

खरिपाचे देशात सर्वसाधारण क्षेत्र १० कोटी ७३ लाख हेक्टर असून, आतापर्यंत १० कोटी ८१ लाख हेक्टरवर पेरण्या उरकल्या आहेत. गेल्या वर्षी १० कोटी ९४ लाख हेक्टरवर पेरण्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उरकल्या होत्या. भाताचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा ६१ हजार हेक्टरने वाढून चार कोटी एक लाख हेक्टरच्या पुढे पोचले आहे. त्याचप्रमाणे डाळींचे क्षेत्र एक लाख ५९ हजार हेक्टरने वाढून एक कोटी ३६ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. बाजरीच्या क्षेत्रात पाच लाख २९ हजार हेक्टरने घट होऊन सहा कोटी ३३ लाख हेक्टरपर्यंत बाजरीची पेरणी झाली आहे. मक्याच्या क्षेत्रात एक कोटी ५६ लाख हेक्टरची भर पडून यंदा मक्याखालील क्षेत्र ८० लाख ९८ हजार हेक्टर झाले आहे. तेलबियांच्या क्षेत्रात तीन लाख २० हजार हेक्टरची घट झाली आहे. आतापर्यंत तेलबियांच्या लागवडीखाली एक कोटी ९० लाख हेक्टर क्षेत्र आले आहे. भुईमूग क्षेत्र दोन लाख २६ हजार हेक्टरने कमी होऊन ४८ लाख ५० हजार हेक्टर झाले आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात ९८ हजार हेक्टरची वाढ होऊन ते एक कोटी २१ लाख हेक्टर झाले आहे. सूर्यफुलाचे क्षेत्र वाढून एक लाख ४५ हजार हेक्टर झाले आहे.

हेही वाचा: गुजरातला १५ टीएमसी पाणी दिले तरच महाराष्ट्राला निधी

साखर कारखानदारीला दिलासा

देशातील साखर कारखानदारीला दिलासा मिळेल अशी उसाच्या लागवडीची स्थिती आहे. उसाची लागवड ५४ लाख ७० हजार हेक्टर झाली आहे. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ७४ हजार हेक्टरने अधिक आहे. कपाशीचे क्षेत्र आठ लाख ३२ हजार हेक्टरने घटले आहे. सद्यःस्थितीत एक कोटी १८ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

देशासारखा ‘ट्रेंड’ राज्यात

यंदाच्या खरिपात देशासारखा गेल्या वर्षीच्या तुलनेत पिकांच्या क्षेत्रातील घट आणि वाढीचा ‘ट्रेंड’ राज्यात राहिला आहे. राज्यात भात, मका, तूर, उडीद, सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. मात्र ज्वारी, बाजरी, मूग, कपाशीच्या क्षेत्रात घट झाली आहे. यंदा राज्यात आतापर्यंत खरिपाच्या पेरण्या जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत पोचल्या आहेत. राज्याचे खरिपाचे उसासह दीड कोटी हेक्टरहून अधिक आहे.

हेही वाचा: कर्जबाजारी शेतकऱ्याची श्रीपूरवडे येथे आत्महत्या

loading image
go to top