esakal | 48 गुंठे वडिलोपार्जित शेती असूनही शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा; कुटुंबियांचा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

farmer death

कर्जबाजारी शेतकऱ्याची श्रीपूरवडे येथे आत्महत्या

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : श्रीपूरवडे शिवारात प्रकाश ठाकरे यांच्याकडे ४७ गुंठे वडिलोपार्जित शेती होती. मात्र एके दिवशी शेतात पाहणी करत असताना कुटुंबियांना ती घटना लक्षात आली. अन् कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.

कर्जबाजारीपणा...त्यात अपेक्षित उत्पन्न मिळाले

श्रीपूरवडे शिवारात प्रकाश ठाकरे यांच्याकडे ४७ गुंठे वडिलोपार्जित शेती होती. यंदाही खरीप हंगामात खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँक, हातउसनवार आणलेले असे सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. शेतात पाहणी करत असताना आत्महत्येची घटना लक्षात आली. कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. नंतर आजूबाजूचे शेतकरी धावून आले. श्रीपूरवडे (ता. बागलाण) येथील तरुण शेतकऱ्याने शेतमालाचे कोसळलेले भाव, कर्जबाजारी, शेतमालाचे झालेले नुकसान आदी बाबींना कंटाळून आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. प्रकाश केशवराव ठाकरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा: नाशिक : स्वयंघोषित महाराजांच्या भोंदूगिरीचा भांडाफोड!

शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा

पोलिसपाटलांनी माहिती दिल्यावरून जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक भदाणे, सुनील पाटील, मंडलाधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अभिमन पगार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने बागलाण तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून, शासनाने ठाकरे कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पगार यांनी केली आहे. नामपूर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा: नांदगाव : पुराच्या पाण्याने शहराला वेढले

loading image
go to top