Nashik Agriculture News : सोयाबीन, भुईमूग, नागली, उडीदाच्या क्षेत्रात वाढ; खरीपाची पेरणी शक्य

Kharif
Kharifesakal

Nashik Agriculture News : दिंडोरी तालुक्यात पावसाळ्यांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कृषी विभागाने यंदाचे आपले खरीप हंगाम पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

मागील वर्षी १३ हजार हेक्टर व झालेल्या पेरणी क्षेत्रात या यावर्षी तब्बल पाच हजार हेक्टरची वाढ होण्याची शक्यता आहे. (Kharif sowing is expected on an area of ​​18 thousand hectares nashik agriculture news)

यंदा तब्बल १८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपांची पेरणी अपेक्षित आहे. त्यासाठी १३ हजार ४८५ क्विंटल बियाणे लागणार आहे. खरीप हंगाम यशस्वी व्हावा म्हणून मागील वर्षी २४ हजार ४३४ मे. टन खतांची मागणी नोंदवली होती. त्यामुळे यंदाच्या खत मागणीत आता मोठी वाढ होण्याची दिशा निश्चित केली आहे. त्यासाठी टप्याटप्याने खतांचा पुरवठा सुरू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नागली, वरई, ज्वारी, बाजरी, कोद्रा, सावा, राळा यांचे क्षेत्र वाढीकडे कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी विविध पिकांचे प्रकल्प तसेच मिनिकिट्स वाटप देखील करण्यात येणार आहे.

प्रमाणित बियाणे वितरणांतर्गत भात, सोयाबीनचे महाबीजचे बियाणे अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना परमिटव्दारे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी विभागांने दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kharif
Agriculture : चढ्या दराने बियाणे विक्री भोवली! ६ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबीत

सोयाबीनचा वाढता भाव पाहता यंदा सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार असा अंदाज वर्तवला जात आहे. मक्याच्या क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. खरिप बाजरीच्या क्षेत्रात मात्र लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.

यंदा पाण्याचे नियोजन चांगले असल्याने मका क्षेत्रात वाढीची शक्यता आहे. बियाणे मागणीमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. सोयाबीन, भुईमूग, नागली,ज्वारी, वरई यांची चांगल्या प्रतिच्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी वर्गाची लगीनघाई सुरू झाली आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

तालुक्यातील शेतकरी वर्ग दरवर्षी सोयाबिनला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. गतवर्षी ८०.८०% क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली होती. लाल कांद्याबरोबर सोयाबीन क्षेत्र वाढताना दिसत आहे. खरीप हंगामात यांत्रिकीकरणाच्या साह्याने मशागत करणे मात्र कठिण झाले आहे.

Kharif
Kharif Season Preparation: यंदा तृणधान्यासह मका, सोयाबीनचा पीक पॅटर्न! पावसावर ठरणार पिकांचे क्षेत्र

इंधनाचे भाव वाढल्याने पारंपरिक साधनांवर भर देण्यात येत आहे. सोयाबीनबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

दुर्लक्षित तृणधान्य वाढीवर भर :-

यंदा तालुका शेतकी विभागाने नागली, वरई, ज्वारी, बाजरी, कोद्रा, सावा, राळा या दुर्लक्षित तृणधान्याचे क्षेत्र वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पेरणी क्षेत्र राखीव ठेवण्याचे आवाहनही केले आहे. मागील वर्षी बाजरीसाठी ७.००, नागलीसाठी १८९.००,वरईसाठी २.००,ज्वारीसाठी २.८० .हेक्टर क्षेत्र निश्चित होते. परंतु यंदा मात्र या पिकांच्या पेरणीसाठी लक्षणीय वाढ होणार करण्यात येणार आहे.

"दिंडोरी तालुक्यातील खरीप पेरणी हंगामाचे यंदाचे उद्दिष्ट १८ हजार हेक्टर क्षेत्र इतके आहे. बियाणे, खतांची टंचाई भासणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचा विमा आवर्जून काढावा." - विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी, दिंडोरी.

Kharif
Kharif Season Preparation : जिल्ह्यात खते अन बियाण्यांचा पुरेसा साठा : कैलास शिरसाठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com