Khelo India Women Kho-Kho League : वृषाली अन् कौसल्याला सुवर्णपदक!

Vrishali and Kausalya
Vrishali and Kausalyaesakal

नाशिक : खो- खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने खेलो इंडिया महिला खो- खो लीग चंडीगड येथे आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या महिलांच्या संघात संस्कृती नाशिकच्या खेळाडू वृषाली भोये आणि कौसल्या पवार यांची निवड झाली होती. लीगमधील विजेत्या महाराष्ट्र संघाला दोन लाख ७५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. (Khelo India Women KhoKho League Gold medal for Vrishali and Kausalya nashik news)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Vrishali and Kausalya
Maharashtra Kesari: माजी विजेत्या सदगीरला पराभवाचा धक्का! शिवराज राक्षे किताबासाठी लढणार

संघाच्या या विजयात वृषाली आणि कौसल्या या दोघींचा मोलाचा वाटा आहे. वृषाली श्रीराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीमध्ये तर कौसल्या ही केटीएचएम कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

या दोघी नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचालित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे गीतांजली सावळे व उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर नियमीत सकाळ सायंकाळ सराव करत असतात.

या दोघींच्या निवडी बद्दल जिल्हा खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू महाराज खैरे, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल यांनी अभिनंदन केले आहे.

Vrishali and Kausalya
Maharshtra Kesari : एकाच गुरूचे दोन शिष्य भिडले; शिवराजनं दोस्तालाच केलं चितपट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com