esakal | नाशिकच्या मुलींनी घडवला इतिहास! खो-खो संघ प्रथमच अंतिम फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

kho kho

नाशिकच्या मुलींनी घडवला इतिहास! खो-खो संघ प्रथमच अंतिम फेरीत

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या मुलींनी गत वर्षीचा उपविजेता पुणे संघाला उपांत्य फरीत मात देत अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला. तिन दशकांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केल्याने नाशिकच्या खो-खो क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्विकारले. पुणे संघाने नाशिकचे सात गडी बाद केले. नाशिककडून खेळताना सरिता दिवा २.३० सेकंद, ऋतुजा सहारे २.४० सेकंद, कौसल्या पवार १.३०, दिदी ठाकरे व मनीषा पडेर प्रत्येकी १ मिनिट यांनी संरक्षणाची धुरा सांभाळली. आक्रमण करताना वृषाली भोये यांनी ३ गडी, मनिषा पडेर व ऋतुजा सहारे प्रत्येकी २ गडी, कौसल्या पवार व यशोदा देशमुख यांनी प्रत्येकी १ गडी बाद करून मध्यांतराला ९ विरूद्ध ७ अशी दोन गुणांची विजयी आघाडी घेतली.

हेही वाचा: CET : अधिकृत तारखांची प्रतीक्षा! विद्यार्थी-पालकांत संभ्रम

दुसऱ्या डावात पुणे संघाने नाशिकचे ४ गडी बाद केले. नाशिक कडून खेळताना सरिता दिवा २.३०, सोनाली पवार व मनिषा पडेर प्रत्येकी २.२० सेकंद तर दिदी ठाकरे १ मिनिट व कौसल्या पवार नाबाद ०.५० सेकंद यांनी विजयाचे पारडे आपल्या बाजूने फिरविले. शेवटच्या आक्रमणात नाशिक संघाला विजयासाठी अवघ्या तीन गुणांची आवश्यकता होती. वृषाली भोये, मनिषा पडेर व विद्या मिरके यांनी प्रत्येकी १ गडी बाद करून आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन गेल्या. हा सामना नाशिक संघाने १३ विरुध्द ११ असा दोन गडी व २.५० सेकंद राखून

नाशिकच्या या ऐतिहासीक विजयाबद्दल नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी फोनद्वारे सर्व पदाधिकारी आणि मुलींचे अभिनंदन करून विजेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: नाशिक : 'सीएनजी'साठी भल्‍या पहाटेपासून रांगा

loading image
go to top