शेअर मार्केट व्यावसायिकाचे अपहरण करून लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

शेअर मार्केट व्यावसायिकाचे अपहरण करून लुटले

सातपूर (नाशिक) : शेअर मार्केट व्यावसायिकाचे अपहरण करून दोन मोबाईलसह २० लाख रुपये तसेच ऑडी कार, असा मुद्देमाल लंपास केला. यातील ऑडी कार सातपूर पोलिसांनी औरंगाबाद येथून हस्तगत केली आहे. फरारी संशयिताचा तपास सातपूर पोलिस करत आहे. (kidnaping stock market trader stolen Rs 20 lakh with two mobiles and Audi car in nashik news)

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करणारे खुटवडनगर येथील नरेंद्र बाळू पवार यांच्याशी अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट संबंधित काम आहे, असे सांगून २९ जूनला रात्री साडेआठ वाजता आयटीआय सिग्नल येथे बोलावून घेतले. त्यांची सकाळ सर्कल येथे भेट झाली असता, पवार यांना बळजबरीने कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत पाच कोटी रुपये दे अन्यथा मारून टाकू, अशी धमकी दिली.

हेही वाचा: बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट बनविणारा गजाआड

त्यांच्या खिशातील दोन्ही मोबाईल काढून घेतले. घाबरलेले पवार यांनी औरंगाबाद येथील मित्राकडून पैसे घेऊन देतो, असे सांगितले. पवार यांच्या विजय खरात नामक मित्राने औरंगाबाद, सिडको बस स्टॅन्ड येथे संशयिताच्या औरंगाबाद येथील साथीदाराने वीस लाख रुपये स्वीकारल्यानंतर पवार यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. दरम्यान, संशयितांनी या एक तासात घोटी- त्र्यंबक असा प्रवास करत पुन्हा पवार यांना तेथेच आणले. मात्र एर्टीगा गाडीतून उतरून पवार यांच्या ऑडी गाडीत बसवले.

दोन्ही बाजूने संशयित बसल्याने पवार यांची खुटवडनगर येथील मनोज पवार नामक यांच्या घराजवळ नेले. मात्र, पवार यांनी संशयितांना पैशासाठी मित्राकडे जाऊ असे सांगून खोटे सांगून स्वतःच्याच घराकडे नेले. संशयितांना बाहेर थांबवून रात्री बाराच्या सुमारास स्वतःची सुटका करून घेतली.

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर ठाण्याचे उपनिरीक्षक श्याम जाधव, हवालदार संजय शिंदे, अनंत महाले, जाधव आदींनी औरंगाबाद रांजणगाव पोळ येथून ऑडी कार हस्तगत केली आहे. फरारी आठही संशयितांचा सातपूर पोलिस कसून शोध घेत असून, औरंगाबाद येथे पथके रवाना केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक श्याम जाधव, उपनिरीक्षक राठोड हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: नागपूरच्या व्यापाऱ्याचा पागोरा जंगलात खून

Web Title: Kidnaping Stock Market Trader Stolen Rs 20 Lakh With Two Mobiles And Audi Car In Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikcrimeAbduction