esakal | तृतीयपंथीय ‘पोलिसमित्र' म्हणून पोलिसांच्या मदतीला! पाहा video

बोलून बातमी शोधा

transgender on Road
...अन् तृतीयपंथीय धावले पोलिसांच्या मदतीला! पाहा video
sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : सध्या कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. लोक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर फिरत असून, पोलिसांच्या मदतीला आता तृतीयपंथीय ‘पोलिसमित्र’ म्हणून रस्त्यावर उतरले आहेत.

देताहेत खडा पहारा......

तृतीयपंथीय ‘पोलिसमित्र’ म्हणून सध्या खडा पहारा देत असून, येथील नागरिकांना बाहेर फिरू नका, अशी विनंती करीत आहेत. तृतीयपंथीय सध्या नाशिक रोड पोलिसांना मदत करीत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ते बाहेर फिरू नका, अशी हात जोडून विनंती करीत आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांना गाड्या तपासण्यासाठी मदत करीत आहेत. बिटको सिग्नलवर तृतीयपंथीय सध्या पोलिसमित्र म्हणून काम करीत आहेत. मागील वर्षी मे महिन्यातही तृतीयपंथीयांनी पोलिसांना अशीच मदत केली होती. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरी, शीला पायल नंदगिरी, नीलम पायल नंदगिरी आणि इतर किन्नर बांधव सेवा करीत आहेत.