आज मस्ट
35170
किरण चौधरी
--
धुळ्याचा किरण चौधरींना
महाराष्ट्र समाजरत्न गौरव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : पुणे येथील सह्याद्री फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील गुणवंतांना ‘नक्षत्र आयकॉन ॲवॉर्ड २०२६’ अंतर्गत महाराष्ट्र समाजरत्न गौरव पुरस्काराने रविवारी (ता. १५) पुणे येथे सन्मानित करण्यात आले. आमदार अनुप अग्रवाल यांचे स्वीय सहाय्यक किरण ज्ञानेश्वर चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सह्याद्री फाउंडेशनतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या गुणवंतांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. किरण चौधरी यांचे सामाजिक योगदान, त्यांची मेहनत आणि यशाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुण्यातील चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट आणि रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये रविवारी दुपारी चारला हा सोहळा पार पडला. शास्त्रज्ञ डॉ. अभिजित दास, अभिनेत्री आर्या घारे, समाजसेवक डॉ. राजेंद्रसिंग वालिया यांच्या हस्ते किरण चौधरी यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना मान्यवरांनी श्री. चौधरी यांच्या कार्याचे कौतुक केले. पुरस्कारबद्दल श्री. चौधरी यांनी समाधान व्यक्त करत आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात यापुढेही समाजहितासाठी कार्यरत राहणार असल्याचे भावना व्यक्त केली