कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दुधाच्या भावात किरकोळ वाढ; खरेदीदारांत उत्साह

kojagiri.jpg
kojagiri.jpg

नाशिक : कोजागरी पौर्णिमा व ईदच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. २९) सायंकाळी दुधाच्या भावात किरकोळ वाढ झाली, तरी खरेदीदारांचा उत्साह टिकून होता. किरकोळ बाजारात म्हशीचे दूध ७०, तर गायीचे दूध ४० रुपये लिटर दराने उपलब्ध होते. यासाठी सक्यामेव्यासह दुधाच्या मसाल्याला मागणी होती. 

मात्र भावात वाढ होण्याची शक्यता

कोजागरी पौर्णिमेला ठिकठिकाणी आटवलेले मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. त्यासाठी मित्रमंडळी, आप्तस्वकीय एकत्र येत गरमागरम मसाला दुधाचा आनंद घेतात. शहरातील अनेक मंडळांतर्फेही कोजागरी पौर्णिमेचे कार्यक्रम घेतले जातात. यंदा प्रथमच कोरोनामुळे उत्साह नसल्याने दुधासह मसाल्यांच्या दरात भाववाढ झालेली नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. दूध मसाल्याला मोठी मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. दरवाढीच्या धास्तीने अनेक जण आदल्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर दुधाची खरेदी करतात. कोजागरीबरोबरच ईदही असल्याने दुधाच्या भावात वाढ होण्याची शक्यता हलीम पहिलवान या दूधविक्रेत्याने सांगितले. 

दुधाच्या पिशव्यांना मागणी 

शहरासह उपनगरांत गायी-म्हशींचे अनेक गोठे आहेत. वडाळा, पाथर्डी, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, वाडीवऱ्हे, सांजेगाव, महिरावणी या भागातूनही दूधविक्रेते येतात. नगर जिल्ह्यातील संगमनेर भागातील डेअऱ्यांचे दूधही पॅक पिशव्यांमध्ये उपलब्ध होते. डेअरीमधून दूध उपलब्ध न झाल्यास अनेक जण अशा दूध पिशव्यांचाच आधार घेतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com