NCP Political Crisis : नो चिंता, सच्चा कार्यकर्त्यांची ‘राष्ट्रवादी’ : कोंडाजीमामा आव्हाड

Nashik District President Kondajimama Awad in discussion with NCP National President Sharad Pawar at Silver Oak. Neighbors Somnath Bhise, Dattatraya Malode.
Nashik District President Kondajimama Awad in discussion with NCP National President Sharad Pawar at Silver Oak. Neighbors Somnath Bhise, Dattatraya Malode. esakal

NCP Political Crisis : जो सच्चा कार्यकर्ता होता तोच आता पक्षात राहिला आहे. जे नाहीत ते जातीलच... त्यांची चिंता नाही. पवारसाहेबांवर प्रेम करणारा व त्याच्या विचारांशी जुळलेला खरा कार्यकर्ता, मतदार आज आमच्या समवेत आहे, याचा आम्हाला आनंदच नव्हे तर त्याचा अभिमान आहे.

नाशिकमध्ये सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्यांची खरी ‘राष्ट्रवादी’ राहिली आहे, असे मत राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. (Kondaji Mama Avhad statement about true activist ncp nashik news)

श्री. आव्हाड म्हणाले, की आज मुंबईला बैठक होती. कुठलाही फोन नाही... निरोप नाही... कुठलीही येण्या- जाण्याची व्यवस्था नसताना सोशल मीडियावरील चर्चेतून पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली चव्हाण सेंटरला झालेल्या बैठकीत किमान ६० चारचाकी वाहने हे नाशिकमधून आली होती. सुमारे ५०० ते ६०० पदाधिकारी- कार्यकर्ते व जागरूक मतदार आलेला होता.

नाशिक-दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील हा मतदार, कार्यकर्ता साहेबांना विश्र्वास देत होता. हाच आमच्या पक्षाचा खरा अभिमान आहे. बंड करणाऱ्यांची काय अवस्था आहे, हे सर्व महाराष्ट्र पाहात आहे.

त्यांना एक वर्षात काय काय पाहावे लागले हे यांना ते पाहण्यासाठी अल्पकाळच लागेल; अवघ्या पंधरा दिवसांत काय चित्र दिसते, हे आपणा सर्वांनाच दिसेल. त्यामुळे कुठलीही चिंता न करता सच्चा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उद्यापासून पक्षाची बांधणी करणार आहोत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik District President Kondajimama Awad in discussion with NCP National President Sharad Pawar at Silver Oak. Neighbors Somnath Bhise, Dattatraya Malode.
NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत आज झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला आघाडी, तसेच विविध आघाडीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून झालेली गळती दूर करण्याचे काम केले जाईल.

त्यांनतर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून बांधणीप्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे श्री. आव्हाड यांनी सांगितले. आज आमदार उत्तम भालेराव, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, गजानन शेलार, माजी दत्तात्रय माळोदे, सुरेश सानप, पुरषोत्तम कडलग आदी पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

"तोडा, फोडा, भीती दाखवा अन्‌ पक्षात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. अगोदर शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली आहे. भारतीय जनता पक्षाला मतदारच आता त्यांची जागा दाखवेल, यात काडीमात्र शंका नाही. राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रश्‍,न तर ‘समता’ गेली खरी राष्ट्रवादी आता जिल्ह्यात राहिली आहे." - गजानन शेलार, माजी गटनेते, महापालिका, नाशिक

Nashik District President Kondajimama Awad in discussion with NCP National President Sharad Pawar at Silver Oak. Neighbors Somnath Bhise, Dattatraya Malode.
NCP Political Crisis: बुडत्याचा पाय अधिक खोलात! राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात करावी लागणार कसरत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com