Kumbh Mela
sakal
नाशिक: रुद्राक्षाच्या संस्कृतीची परंपरा असणाऱ्या नाशिकनगरीत आध्यात्मिक विषयांच्या पुस्तकांचा तुटवडा नाही. त्यात सिंहस्थ २०२७ जवळ येऊन ठेपल्याने येत्या वर्षभरात शेकडो धार्मिक पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. शहरातील नावाजलेल्या प्रकाशकांकडे ही पुस्तके लेखकांकडून आली असून, मुद्रितशोधन, सेटिंग या प्रोसेस सुरू झाल्या आहेत.