

Nashik Kumbh Mela 300 Trees Cutting
esakal
Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याची योजना असल्याने तब्बल १ हजार ८०० झाडं तोडावी लागणार आहेत. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात आजपासून वृक्षतोडीस सुरुवात झाली असून नवीन एसटीपी (सीवरेज ट्रीटमेंट प्लांट) उभारणीसाठी ३०० झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यामुळे वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने ४४७ झाडांना रीतसर परवानगी घेतल्याचा दावा केला आहे.