नाशिक- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मर्जीतील अधिकारी नियुक्तीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. या संघर्षात सिन्नर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी अभिजित कदम यांची नियुक्ती करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना शह दिल्याची चर्चा आहे.