Kumbh Mela
sakal
नाशिक: भाविकांची सुरक्षितता व गर्दी नियंत्रणासाठी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बसविल्या जाणाऱ्या सीसीटीव्हीच्या कामात अनियमितता झाली असून, जे काम २०१५ मध्ये ९.९४ कोटी रुपयांना दिले होते तेच काम सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २९४ कोटी रुपयांना देण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. यासंदर्भात न्यायालयीन चौकशीची मागणी करण्यात आली आहे, तर स्मार्टसिटी कंपनीने हा आरोप फेटाळताना पुरावे दिल्यास चौकशी करू, असे उत्तर दिले आहे.