Kumbh Mela Cleanliness Planning
sakal
नाशिक: सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह तिच्या उपनद्या तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. गोदावरीसह उपनद्यांच्या स्वच्छतेकरिता नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, सर्वसामान्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.