Girish Mahajan
sakal
नाशिक: कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात रस्ते, गोदावरी स्वच्छता, मलनिस्सारण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. कामाच्या निमित्ताने नाशिककरांची तात्पुरती गैरसोय होऊ शकते, परंतु भविष्यात कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त करताना दर्जेदार कामांसाठी सहकार्याचे आवाहन केले. कामांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.