Kumbh Mela
sakal
नाशिक
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षा: नाशिक शहर-ग्रामीण पोलिसांच्या निधीला तातडीने मंजुरी
Chief Minister Approves Police Fund for Nashik Kumbh : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि शहर-ग्रामीण पोलिसांच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी आवश्यक निधीला तातडीने मंजुरी दिली.
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहर- ग्रामीण पोलिसांसाठी असलेल्या निधीला तातडीने मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या काळात पोलिसांना सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक उपाययोजनाच्या कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे.
