Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: कुंभमेळ्याचे निमित्त करून पुढील २५ वर्षांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे सक्षमीकरणाचे काम दिलेल्या विश्वराज अर्थात काम मिळाल्यावर नामकरण करण्यात आलेल्या ‘कुंभ वेस्ट वॉटर मॅनेजमेंट’ कंपनीला काम सुरू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाकडून १५० कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. करारानुसार सदर निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी काम होण्यापूर्वीच निधी वर्ग करण्याचा अजब करारनामा महापालिकेला आर्थिक खड्ड्यात घालणारा ठरत आहे.