Kumbha Mela 2027 : कुंभमेळ्यासाठी सव्वाचार हजार कोटी खर्चाचा अंदाज

Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi news
Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi newsesakal

नाशिक : २०२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याला अजून अवकाश असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने साधूग्रामसाठी ३५४ एकर जागा संपादित करण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला असून, त्यासाठी ४१२७ कोटी रुपये लागणार असल्यास अंदाज आहे. त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्याची तयारी करण्यात आली आहे. (Kumbha Mela 2027 Estimated expenditure for Kumbh Mela 4 thousand crore nashik news)

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi news
Nashik Crime News : कळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सिंहस्थासाठी लाखो साधू व भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. नाशिकमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालक संस्था म्हणून महापालिकेची आहे. महापालिकेला केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होतो. निधी मिळवण्यासाठी महापालिकेला प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न भूसंपादनाचा असतो. यापूर्वी महापालिकेने साधूग्रामसाठी ७० एकर जागा अधिग्रहीत केली आहे. त्या व्यतिरिक्त २०२६-२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ७० एकर जागा वगळता ३५४ एकर जागा संपादित करण्याचे नियोजन केले आहे.

त्यासाठी ४१२७ कोटी रुपये लागणार असल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाची भूसंपादनासाठी निधी देण्याची तयारी नसल्याने जागा मालकांना टीडीआर बदल्यात जागा द्यावी लागणार आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सिंहस्थासाठी भूसंपादन करताना जागा मालकांना चार ते पाच टीडीआर देण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते.

उज्जैन, वाराणसीचा अभ्यास करणार

सीएससी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उत्तर प्रदेशमधील वाराणसी, मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे. तेथील नियोजनामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या नाशिकमध्ये दुरुस्त करण्यास वाव असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Nashik Kumbha Mela 2027-28 Latest marathi news
Nashik Crime News : धान्य वितरण व्यवस्थेतील धान्यसाठा जप्त; ग्रामीण पोलीसांची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com