Nashik Cancer Centers : नाशिकसह महाराष्ट्रात ९ कर्करोग उपचार केंद्रांना मंजुरी; रुग्णांना मिळणार स्थानिक पातळीवर 'जीवनदान'!
Maharashtra Approves Nine L2 Cancer Treatment Centers : महाराष्ट्र शासनाने नाशिक, पुणे, नागपूरसह राज्यातील ९ ठिकाणी 'द्वितीय स्तरावरील (L-2)' कर्करोग उपचार केंद्रे मंजूर केली आहेत. ही केंद्रे निदान, उपचार आणि संशोधनासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीने सुसज्ज असतील.
नाशिक: द्वितीय स्तरावरील कर्करोग केंद्र म्हणून राज्यात नऊ केंद्रांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यात नाशिक, अमरावती, पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांचा समावेश आहे.