Latest Marathi News | शहरातील 89 अंगणवाड्यांचे छप्पर गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anganwadi News

Lack of Facilities in Anganwadi : शहरातील 89 अंगणवाड्यांचे छप्पर गायब

नाशिक : राज्य शासनाच्या एकात्मिक बालकल्याण विभागाच्या धर्तीवर महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांच्या सर्वेक्षणात धक्कादायक समोर आली आहे. ८९ अंगणवाड्या उघड्यावर भरविल्या जात आहे, तर १४० अंगणवाड्यांना मूलभूत सुविधाच नसल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आले आहे. सुविधा पुरविण्यासाठी आता नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण उपायुक्त डॉ. दिलीप मेणकर यांनी दिली. (Lack of Basic Facilities in 140 Anganwadis in city Nashik News)

शहरात महापालिकेच्या ४१९ अंगणवाड्या आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबरोबरच गरीब पालकांना आर्थिक फटका लागू नये यासाठी अंगणवाड्या चालविल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून चालवल्या जाणाऱ्या अंगणवाड्या व त्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय समाज कल्याण उपायुक्त डॉ. मेणकर यांनी घेतला.

त्यासाठी त्यांनी स्वतः अंगणवाड्यांना भेट दिली. त्याचा एक सर्वेक्षण अहवाल तयार केला. या अहवालात ४१९ पैकी ८९ अंगणवाड्यांना जागा नसल्याने उघड्यावर भरविल्या जात असल्याची बाब निदर्शनास आली. या अंगणवाड्या झाडाखाली मंदिराच्या आवारात व खासगी जागांमध्ये भरविल्या जातात. ८९ अंगणवाड्यात व्यतिरिक्त १४० अंगणवाड्या अशा आहेत, की त्यात मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही.

हेही वाचा: Chain Snatching Crime : 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याच्या पोत लंपास

अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी नसणे स्वच्छतागृह नसणे ज्या अंगणवाड्यांना छत आहे ते छत गळके आहे, तर अनेक अंगणवाड्यांचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत मिळवून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

अंगणवाड्यांची विभागनिहाय दुरवस्था

विभाग अंगणवाडी

पूर्व १६

पश्चिम ८

पंचवटी २२

सातपूर ८

नाशिक रोड २०

सिडको १५

"महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये इमारतींसह मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे."

- डॉ दिलीप मेणकर, समाज कल्याण उपायुक्त, महापालिका.

हेही वाचा: CNG Rates Hike : नाशिकमध्ये CNG किमतीत करासह 4 रुपयांनी झाली वाढ

टॅग्स :NashikschoolAnganwadi