Nashik: लासलगावला कर्मचाऱ्यांच्या संख्येअभावी रुग्णांची गैरसोय; केवळ 17 कर्मचाऱ्यांवर ग्रामीण रुग्णालयाचा भार

Closed x-ray department in rural hospital
Closed x-ray department in rural hospitalesakal

Nashik News : येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहतात. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांंनी लक्ष घालून रुग्णांची गैरसोय टाळावी. (Lack of staff at Lasalgaon puts patients at disadvantage rural hospital burden of only 17 employees Nashik)

ग्रामीण रुग्णालयात अनेक असुविधा असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य केशव जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयात पाहणी केली असता, अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले.

क्ष-किरण मशिनरी तंत्रज्ञ नसल्याने धूळखात पडली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शवविच्छेदनगृह बंद आहे. नवीन बांधलेले प्रसूतिगृह बंद आहे. आजपर्यंत रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकीय अधीक्षक सांभाळत आहेत.

कर्मचाऱ्यांची कमतरता व सुविधांचा अभावामुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना निफाड अथवा नाशिकला रवाना केले जाते. ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना, ऑगस्टअखेर फक्त १६ कर्मचारी असून, ११ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Closed x-ray department in rural hospital
Nashik Water Supply: शहरात शुक्रवारपासून 2 दिवसांआड पाणीपुरवठा : आयुक्त भालचंद्र गोसावी

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. दंत शल्यचिकित्सकाचे पद रिक्त आहे. क्ष किरण तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. परिचारिका संख्या सात असून, चार मंजूर आहेत. तीन पदे रिक्त आहेत. वर्ग ३ ची अनेक पदे रिक्त आहेत. १७ कर्मचाऱ्यांवर रुग्णालयाचा भार आहे.

वैद्यकी अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांअभावी होत असलेली रुग्णांची गैरसोय, वैद्यकीय असुविधेकडे प्रशासनाने गांभीर्याने बघावे व नवीन बांधलेले प्रसूतिगृह, शवविच्छेदन गृह सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य केशव जाधव यांनी केली आहे.

"लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील सद्यस्थिती बघता प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरून रुग्णांची गैरसोय टाळावी. आठ दिवसांत आरोग्य विभागाच्या प्रशासनाने लक्ष न दिल्यास शिवसेने स्टाईलने हिसका दाखविला जाईल." -प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख, निफाड

Closed x-ray department in rural hospital
Nashik News: गिरणा खोरे पुन्हा उपाशी ठेवणार का? वांजूळ पाणी संघर्ष समितीचा अजित पवारांना प्रश्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com