Girish Mahajan
sakal
नाशिक: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहिणींना शासनाने आर्थिक सक्षम केले. पण, बहिणींना दिल्या जाणाऱ्या अनुदानावरून सावत्र भावांना पोटदुखी होत आहे. आगामी निवडणुकांनंतर योजना बंद केली जाईल, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. मात्र, लाडकी बहीणसह अन्य योजना बंद पडणार नाहीत, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.