Lakshmi Pujan 2023: लक्ष्मी मूर्तीवर कारागिरांचा अखेरचा हात! किमतीत 10 टक्के वाढ

Sculptor putting the final touches on the idol ready for Lakshmi Puja
Sculptor putting the final touches on the idol ready for Lakshmi Pujaesakal

Lakshmi Pujan 2023 : दिवाळीनिमित्त लक्ष्मी देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली आहे.

दिवाळीत लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. यानिमित्त घरोघरी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मूर्तीची स्थापना करत पूजन केले जाते. (Lakshmi Pujan 2023 Craftsmans final touch on Lakshmi idol 10 percent increase in price nashik)

प्रत्येक घरातून लक्ष्मी मूर्तीची मागणी होत असते. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने मूर्ती तयार करण्याच्या कामास गती मिळाली आहे. ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून, मूर्तिकार कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. सहा इंचापासून ते दीड फुटापर्यंत मूर्ती तयार करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात बाजारातही मुर्ती विक्रीस दाखल होणार आहे.

पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत मूर्ती विक्री होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दरात दहा टक्के वाढ झाली आहे. शिवाय गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षी मूर्तीची मागणी २० टक्क्याने वाढली आहे.

Sculptor putting the final touches on the idol ready for Lakshmi Puja
Diwali Recipe 2023 :यंदाच्या दिवाळीला बनवा सर्वात हटके करंजी वडा; ही आहे रेसिपी

लहान मूर्तीची अधिक मागणी असल्याचे मूर्तिकरांकडून सांगण्यात आले. शहरासह लागून असलेल्या ग्रामीण भागातूनही मूर्तींना मागणी होत आहे. नागरिकांसह मूर्तिकार तसेच विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

"यंदा मूर्तीची मागणी समाधानकारक आहे. रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने मूर्तींच्या किमतीत दहा टक्के वाढ झाली आहे. काही मूर्तीचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे."- संजय परदेशी, मूर्तिकार

Sculptor putting the final touches on the idol ready for Lakshmi Puja
Diwali 2023: यंदाच्या दिवाळीत अशी करा फुलांनी घराची सजावट, घराला येईल उत्तम लूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com