Bhumi Abhilekh Exam : भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षा 28 नोव्‍हेंबरपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam News

Bhumi Abhilekh Exam : भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षा 28 नोव्‍हेंबरपासून

नाशिक : भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भू करमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदांची परीक्षा येत्‍या २८ ते ३० नोव्‍हेंबर दरम्‍यान आयबीपीएस कंपनीमार्फत राज्‍यातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल, अशी माहिती नाशिक भूमि अभिलेख कार्यालयाने कळविली आहे. (Land Records bhumi abhilekh Department Exam from 28th November Nashik news)

हेही वाचा: Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती

सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाते आहे. ही ऑनलाइन परीक्षा (कॉम्पुटर बेस्ड टेस्ट) येत्‍या २८ ते ३० नोव्‍हेंबरदरम्‍यान आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबतची माहिती भूमि अभिलेख विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in येथे उपलब्ध आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेत प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवारांने दिलेल्या वेळेत परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन भूमि अभिलेख कार्यालयाने केले आहे.

हेही वाचा: Ganga Maha Arti : नववर्षापासून होणार गंगामहाआरती; मुनगंटीवारांकडून 5 कोटींचा विशेष निधी