esakal | नाशिककरांना इशारा! गंगापूर धरणातून होणार मोठ्या प्रमाणात विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

gangapur dam

नाशिक : गंगापूर धरणातून होणार मोठ्या प्रमाणात विसर्ग

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नाशिक : आज (ता.२९) 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो 15000 क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने या SOP प्रमाणे सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. नाशिकचे कार्यकारी अभियंता नाशिक सागर शिंदे यांनी माहिती दिली.

राज्यात एकूण १३ जणांचा मृत्यू

राज्यात काल (ता.२८) झालेल्या पुरपरिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे.. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा: 'गोव्यात फोडाफोडीचं राजकारण, शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढणार'

‘गुलाब’ नंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. मंगळवार (ता. २७)पासून सूरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने मराठवाड्यात अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. बुधवारीही (ता. २८) अनेक जिल्ह्यांत पावसाचा दणका सुरूच होता. सद्या गुलाब चक्रीवादळ ओसरले असले, तरी त्याच्या प्रभावामुळे असलेल्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रामुळे (डिप्रेशन) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २९) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातातून आलेल्या 'गुलाब' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि ओडिशाला अतिवृष्टीचा फटका बसला असून जनजिवन विस्कळीत झालं आहे. गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरत असतानाच आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा: गुलाबनंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट

loading image
go to top