Lasalgaon APMC
sakal
लासलगाव: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे रोख स्वरूपात देण्याऐवजी थेट ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय बाजार समितीने प्रायोगिक तत्त्वावर अमलात आणला आहे. दोन दिवसांपासून हा प्रयोग सुरू असून, या निर्णयाबाबत शेतकरी व व्यापारी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.