Diwali Festival: लासलगाव बाजार समिती दिपावलीनिमित्त 12 दिवस बंद

Lasalgaon Market Committee
Lasalgaon Market Committeeesakal
Updated on

लासलगाव : दीपावलीनिमित्त कांदा विभागातील व्यापारी कांदा लिलावात सहभागी होणार नसून लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवार मंगळवार (ता. ७)पासून ते १८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत, तसेच शुक्रवार (ता. १०) ते १८ नोव्हेंबरअखेर धान्य विभागातील व्यापारी शेतीमालाच्या लिलावात सहभागी होणार नसल्याने शेतीमालाचे लिलावही बंद राहतील, असे पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे.

ऐन सणासुदीत कांदा व धान्याचे लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. (Lasalgaon Bazaar Committee closed for 12 days on occasion of Diwali Festival nashik)

Lasalgaon Market Committee
Nashik: मालेगावी मुस्लिमांचा सामुदायिक विवाह; कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्यातर्फे आयोजन

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे. २७ ऑक्टोबरला उन्हाळी कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ५,३०० रुपये दर मिळत होता. त्यात तब्बल १८०० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे.

येथे कांद्याला सरासरी ३५०० रुपये भाव मिळत आहे. हीच परिस्थिती लाल कांद्याची असून, हा कांदा २४०० रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. लाल कांदा किरकोळ प्रमाणात विक्रीस येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Lasalgaon Market Committee
Nashik News: कांदा मार्केट आठवडाभरच बंद ठेवा! दिवाळीमुळे नामपूर मार्केट 14 दिवस बंद असल्याने शेतकऱ्यांचा संताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com