Nashik: मालेगावी मुस्लिमांचा सामुदायिक विवाह; कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्यातर्फे आयोजन

Guardian Minister Dada Bhuse guiding a community marriage ceremony at Aman Chowk in the city
Guardian Minister Dada Bhuse guiding a community marriage ceremony at Aman Chowk in the cityesakal
Updated on

मालेगाव : राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांनी २५ मुस्लीम जोडप्यांचे सामुदायिक विवाह घडवून आणले. ही गौरवास्पद बाब आहे.

सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे शहर विकासासाठी पक्ष भेद बाजूला सारून एकत्र येणे, एकोपा असणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Community Marriage of Malegaon Muslims Organized by Congress District President Eijaz Baig Nashik)

शहरातील अमन चौकात रविवारी (ता. ५) २५ मुस्लिम जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळा पार पडला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजीमंत्री बबनराव घोलप आदी व्यासपीठावर होते.

श्री. भुसे म्हणाले, की गेल्या काही वर्षात असे सामुदायिक विवाह सोहळे पार पडत आहेत. सामान्य व गोरगरीब कुटुंबातील वधू व वरांना याचा मोठा फायदा होतो. शहरात विविध विकास कामांची घोडदौड सुरु आहे.

विकासकामात राजकारण बाजूला ठेवून शहर हितासाठी सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करत आहे. श्री. बेग यांनी सुचविलेली काही कामे देखील मंजूर केल्याचे सांगतानाच त्यांनी आजवर झालेली विकास कामे व प्रस्तावित कामांची माहिती दिली.

Guardian Minister Dada Bhuse guiding a community marriage ceremony at Aman Chowk in the city
Nashik: ‘ऑनलाईन’च्या नावाखाली लाभार्थी धान्यापासून वंचित! तहसील कार्यालयाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

श्री. थोरात यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. असे सामाजिक उपक्रम हिताचे असतात, त्यांना सर्व समाजाने दाद द्यावी. संबंधितांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी यासाठी येथे आलो. श्री. बेग यांनी विवाह सोहळ्याचा हेतू स्पष्ट केला.

आपल्या राजकीय कारकिर्दीस २५ वर्ष पूर्ण झाली आहे, अनाथ २५ मुलींचा विवाह लावून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. या वधू माझ्या मुलीसारख्या आहेत. त्यांना भविष्यातही मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

कॉंग्रेसचे पक्ष निरीक्षक तारिक फारुकी, जमील क्रांती, माजी उपमहापौर सखाराम घोडके, अल्ताफ बेग, माजी नगरसेवक फारुख फैजुल्ला, जैनू पठाण, रियाज बेग, अनिता अवस्थी, यास्मीन बेग, नासिर शेख, डॉ. राजेंद्र ठाकरे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Guardian Minister Dada Bhuse guiding a community marriage ceremony at Aman Chowk in the city
Nashik News: सटाण्यातील वळणरस्ता, उड्डाणपुलाविषयी मतमतांतरे सुरूच! लवकर पूर्ण होणारा पर्याय स्वीकारावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com