Lasalgaon News : कांदा दरात सुधारणा! लासलगावमध्ये सरासरी दर १६८० रुपये; हंगामाच्या अखेरीस शेतकऱ्यांना दिलासा
Summer Onion Arrivals Decline, Prices See Upward Trend : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक घटल्यामुळे दरात सुधारणा झाली.
लासलगाव: दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याची आवक घटली असून नवीन पोळ कांद्याची आवक अद्याप सुरू नसल्याने कांदा दरात सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.