जलवाहिन्यांची गळती नैसर्गिक की कृत्रिम?; 5 महिन्यात 1174 प्रकार

leakage of water
leakage of wateresakal

नाशिक : एप्रिल ते ऑगष्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत दहा, पंधरा नव्हे तर तब्बल एक हजार १७४ जलवाहिनी गळतीचे प्रकार घडले आहे. जलवाहिनी दुरुस्तीसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात जलवाहिनींना गळती झाल्याने या अशा गळती कृत्रिम की नैसर्गिक, असा सवाल नाशिककरांच्या मनात निर्माण झाला आहे. जलवाहिन्या जीर्ण झाल्याचे दाखवून बदलण्याचा घाट घातला तर जात नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Leakage of water channels 1174 cases in 5 months nashik, Latest Marathi News)

गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कच्चे पाणी आणले जाते. पुढे आलम टाकून पाणी शुध्द केले जाते. पुढे ११५ जलकुंभात स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो. दोन हजार ७०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधून घरोघरी पाणीपुरवठा केला जातो.

धरणातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सिमेंट पाइपलाइन द्वारे पाणी आणले जाते. पुढे स्टील पाइपमधून पुरवठा होतो. गावठाण भागात नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. सिडकोत यापूर्वीच पाइपलाइन टाकल्या आहेत. पश्‍चिम विभागात नवनगरांची संख्या अधिक असल्याने येथेदेखील नवीन पाइपलाइन टाकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते.

नाशिक रोड भागातील नवनगरामध्ये नवीन पाइपलाइन टाकल्या जात आहे. असे असताना जलवाहिन्या लिकेज होण्याचे प्रकार वाढले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात १ एप्रिल ते ३१ ऑगष्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत एक हजार १७४ पाणी गळतीचे प्रकार झाले. सिडको विभागात सर्वाधिक गळती झाली आहे. सिडकोत ३६९, पंचवटी २२३, पश्चिम १७६, नाशिक रोड १७१, सातपूर १४७, पूर्व विभागात ८८ वेळा गळती झाली.

गळती दूर करण्यासाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले. जलवाहिन्यांची गळती चिंतेची बाब आहे. परंतु जमिनीखालचे व्यवहार असल्याने गळती नेमकी झाली की नाही तपासण्याची सोय नाही. एक तर गळतीच्या संख्या वाढवून अंदाजपत्रकातील चार कोटी रुपयांची तरतूद संपविणे किंवा जलवाहिन्या जीर्ण झाल्याचे निमित्त करून सरसकट बदलण्याचा प्रकार तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.

leakage of water
गावठाणात ‘SCADA’द्वारे 24 तास पाणीपुरवठा; पाणी वाटपाचे प्रभावी नियोजन होणार

आकुंचनाचा परिणाम

उष्णतेमुळे जलवाहिनी आंकुचन पावतात. अशा वेळी गळती होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याचा कालावधीतील त्यातही मे महिन्यातील जलगळती शक्य आहे. परंतु, अन्य महिन्यातील लिकेज मात्र संशय निर्माण करणारे आहे. मे महिन्यात ३१६, एप्रिल महिन्यात २५९, जून २५७, जुलै १७३, ऑगष्ट महिन्यात १६९ जलवाहिनी गळतीचे प्रकार घडले.

बांधकाम विभागावर खापर

जलवाहिन्यांच्या गळतीचे खापर बांधकाम विभागावर फोडले जात आहे. ज्या वाहिन्यांची गळती होते, त्या जीर्ण झाल्या आहेत. रस्ता खोदाई किंवा ड्रेनेजचे काम करताना तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस व भारत दूरसंचार निगमच्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई सुरू असल्याने त्यातून जलवाहिन्यांची गळती होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

leakage of water
गावठाणात ‘SCADA’द्वारे 24 तास पाणीपुरवठा; पाणी वाटपाचे प्रभावी नियोजन होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com