Nashik Bribe Crime : पालिकेचा कुबेर विभाग ACBच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The anti-corruption department team while detaining the suspects in the municipality on Friday.

Nashik Bribe Crime : पालिकेचा कुबेर विभाग ACBच्या जाळ्यात

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड नगर परिषदेच्या लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक आनंद औटी, रोखपाल संजय आरोटे आणि शिपाई नंदू म्हस्के यांना कन्स्ट्रक्शन फर्मच्या बिलाचा चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून ३६ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. लेखा विभागातील हे ‘वाटप’ इतर कोण कोणत्या अधिकाऱ्यांपर्यंत होत होते, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ekha vibhaag of sinnar Municipality in raid by ACB Nashik Bribe Crime)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यातील तक्रारदार हे काम करत असलेल्या कन्स्ट्रक्शन फर्मचे बिल त्यांनी पालिकेच्या लेखा विभागात जमा करण्यात आलेले होते. संबंधित कामाच्या बिलाचा चेक तयार करून चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात यातील लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक आनंद औटी, शिपाई नंदू म्हस्के यांनी टक्केवारीनुसार ३६ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार तक्रारदार यांनी लाच मागत असल्याची तक्रार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता आज (ता.३) लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३६ हजार रुपये लाचेची रक्कम यातील लेखापाल संजय आरोटे, नंदू म्हस्के यांनी तक्रारदार यांचेकडून स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

या बाबत लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक आनंद औटी (वय ४६), रोखपाल संजय आरोटे (वय ५२) शिपाई नंदू म्हस्के (वय ५८) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनिल बागूल, किरण अहिरराव, अजय गरुड, परशुराम जाधव या पथकाने ही कारवाई केली.