esakal | हिंस्त्र बिबट्याला भिडली मांजर; विहिरीतला थरारक व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard and Cat Fight

हिंस्त्र बिबट्याला भिडली मांजर; विहिरीतला थरारक व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सुधीर काकडे

बिबट्या (Leopard) म्हटलं की अनेकांना पळता भुई थोडी होते. शेतीसाठी होणारी जंगलतोड आणि वाढत जाणाही शहरं यामुळे जंगली प्राण्यांचं मानवीवस्तीकडे येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जातंय. त्यातच अलीकडे मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे अशा अनेक घटना आपल्या कानावर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या विहीरीत पडला असून, या विहीरीत मांजर सोबत असल्याचं दिसतंय. विहीरीत मांजर (Cat) आणि बिबट्याची ही झुंज (Fight) जुंपल्याचे दिसते आहे.

नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या घटनेत विहीरीत पडलेले बिबट्या आणि मांजर आमने-सामने आले आहेत. बिबट्याला पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडतो, मात्र मांजरी या बिबट्याला चांगलीच भिडल्याचे दिसते आहे. मांजराने अजिबात न घाबरता बिबट्याला प्रतिकार केला. बिबट्याने एक पाऊल पुढे टाकताच, मांजर देखील तेवढ्याच तावात बिबट्याच्या अंगावर जातंय. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरतोय.

दरम्यान, विहीरीत पडलेल्या या बिबट्याला बाहेर काढण्याचत आले आहे. वन विभागाने या बिबट्याला विहीरीतून बाहेर काढून अभयआरण्यात सोडण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम नाशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिली आहे.

loading image
go to top