Leopard Attack
sakal
नाशिक: रात्रीचा किर्रर्र अंधार... अचानक परिसरातील कुत्र्यांचा घाबरून भुंकण्याचा येत असलेला आवाज, झुडपात होणारी अपरिचित अशी हालचालींची जाणीव व क्षणार्धातच काही समजण्याच्या आत बिबट्याचे समोर ठाकणे... अन् काळजात धस्स... अशा वेळेस करायचे काय, पळायचे की त्याच्यासमोर धाडसाने उभे राहायचे, आरडाओरड करायची की गप्प राहायचे... अशा द्विधा मन:स्थितीत नेमका कोणता निर्णय घ्यावा, त्यावर शास्त्रशुद्ध उपाय सांगण्याचा हा प्रयत्न...