नाशिक : बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Leopard Attack
Leopard AttackSakal media

सोनज (जि. नाशिक) : गेल्या दोन दिवसापासून अफवा समजला जाणाऱ्या बिबट्याने गुरुवारी (ता.३) रात्री येथील शेतकऱ्यावर हल्ला केला. सोनज येथील शेतकरी बारकू बच्छाव हे गुरुवारी रात्री १० च्या सुमारास सोनज वऱ्हानेपाडा रस्त्यावरील शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने झटपटीमुळे बच्छाव यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

शेतात पाणी देण्यासाठी गेले असता अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बच्छाव यांच्या अंगावर झडप घालून हल्ला केला, परंतु जोराने आवाज करत झटापट केल्यामुळे बिबट्याने पळ काढला. बिबट्यासोबत लहान पिल्लू देखील दिसले असून ते कोणत्या दिशेस गेले हे निश्चित होऊ शकले नाही. गेल्या दोन दिवसांपासून वन विभागाला याबाबत कळविण्यात आले असून अद्याप पिंजरा लावण्यात आलेला नाही. तरी रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्यामुळे अंधारात जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. तरी सदर च्या घटनेमुळे सोनज पंचक्रोशीत प्रचंड दहशत पसरली असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

Leopard Attack
हिरवी मिरची शंभरी पार; गृहिणींचे बजेट कोलमडले


''परवा ग्रामस्थांच्या तक्रारी नुसार प्रत्यक्ष भेट दिली होती. तरी अद्याप कोणालाही बिबट्या कडून त्रास नसल्यामुळे पिंजरा लावण्यात आला नव्हता. तरी आता तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी पुढील प्रयत्न करण्यात येतील.'' - योगेश पाटील, वनरक्षक

''बिबट्याने केलेल्या हल्यामुळे शेतकरी व गावकरी प्रचंड दहशतीत असून शेतीचे काम बंद पडले आहेत. स्थानिक तरुण आणि ग्रामपंचायत प्रशासन आपल्या स्तरावर उपाययोजना करत आहे. वन विभागाला विनंती केली असून त्यांनी तत्काळ बिबट्याला पकडून गावकऱ्यांना भयमुक्त करणे गरजेचे आहे.'' - संग्राम बच्छाव, संचालक, बाजार समिती मालेगाव

Leopard Attack
बाहेरगावी जाताय, काळजी घ्या; परगावी गेलेल्यांच्या घरी घरफोडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com