Maharashtra Wildlife Attack
esakal
सिन्नर: पंचाळे येथील डांबरनाला भागातील थोरात वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात अकरावर्षीय मुलगा ठार झाला. रविवारी (ता. ७) सायंकाळी घडलेल्या घटनेने परिसरातील गावांत खळबळ उडाली आहे. सारंग गणेश थोरात (वय ११) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनेमुळे पंचाळे गावावर शोककळा पसरली आहे.