उपनगर: देवळाली परिसरात वडनेर गेट येथील चारवर्षीय बालक आयुष भगत याचा बिबट्याने बळी घेतला. या धक्क्यातून ग्रामस्थ अजूनही सावरलेले नाहीत. पाच दिवसांत बिबट्याला जेरबंद न केल्यास वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा निर्धार वडनेर दुमाला ग्रामस्थांनी केला आहे.