Leopard
sakal
नाशिक: जिल्ह्यातील बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वन विभागाने पावले उचलली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बिबट्यांच्या हालचालींचे निरीक्षण, पूर्वभाकीत आणि तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा तयार केली जात आहे. या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून १५ कोटी ८१ लाख २०० रुपयांचा आराखडा तयार झाला असून वन विभागाने हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला आहे.