Leopard
sakal
नाशिक रोड: पळसे परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. पळसे येथील गट क्रमांक ५९५ येथील शेतकरी विनोद बबनराव जाधव यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता. १०) पहाटे अंदाजे तीन ते चार वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.