Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Caught in cage

Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी

वडांगळी : चोंढी ता.सिन्नर येथील शिवारात बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. बिबटया पिंजऱ्यात अडकल्या नंतर सुटकेसाठी त्याने प्रयत्न केला. लोखंडी गजांवर बिबट्याने गगनभेदी डरकाळ्या देत पिंजऱ्याला धडका मारल्या.

त्यात तो रक्तबंबाळ झाला आहे.रक्तबंबाळ अवस्थेत सकाळ साडे सातच्या सुमारास वनविभागाने पिंजरा सह बिबट्या सिन्नरला नेला आहे. शेतकरी दत्तात्रय गंगाधर कडभाने यांच्या शेतात चार दिवसांपासून हा पिंजरा उभारला. (Leopard Caught in cage by forest department leopard injured badly nashik news)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

त्यात सावज म्हणून कोंबडी ठेवली होती.पहाटेच्या वेळेस सावज हेरण्यासाठी बिबट्या आला.त्याला सावज मिळाले नाही.

पण पिंजऱ्यात अडकला.सुटकेसाठी धडपडत त्याने लोखंडी गजांवर डोक्याचे घाव घातले.घाव टाकत टाकत तो रक्तबंबाळ झाला. त्याच्या आवाजाने कडभाने परिवाराला जाग आली.त्यांनी वनविभागाला कळविले .

हेही वाचा: Crime News : 3 दिवसात पकडल्या 40 लाखांच्या चार वीजचोऱ्या