नाशिकमध्ये भरवस्तीत शिरला बिबट्या, हल्ल्यात पादचारी जखमी; Watch Video

रात्री आठच्या सुमारास आनंदनगर गुलमोहर कॉलनी येथे बिबट्या दिसला.
Nashik Leopard Attack
Nashik Leopard AttackSakal Digital
Updated on

नाशिक : नाशिक रोड येथे आनंद नगरमधील गुलमोहर कॉलनीत रविवारी रात्री भरवस्तीत बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने रात्रीच्या वेळी या परिसरातील नागरिकांनी बाहेर निघू नये असे आवाहन केले आहे.

Nashik Leopard Attack
Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन... दहा दिवसात तिसरी धमकी

रात्री आठच्या सुमारास आनंदनगर गुलमोहर कॉलनी येथे बिबट्या दिसला. भरवस्तीत बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर निवासी भागातील रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. गुलमोहर कॉलनीतील डॉक्टर कनौजीया यांच्या बंगल्यात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसंच कदम लॉन्ससमोरील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी अवघ्या काही फुटांवर बिबट्या समोर उभा ठाकल्याने पादचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

Nashik Leopard Attack
Mumbai Water Supply Lakes Level : दिलासादायक बातमी! पाणी कपात लवकरच रद्द होणार; ७ तलावांमध्ये 'इतका' पाणीसाठी

बिबट्याने कदम लॉन्सजवळ एका पादचाऱ्यावरही हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. जखमी पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com