Female Leopard Found Dead Near Khede Shivaar
sakal
नाशिक
Nashik Leopard : भनवड रस्त्यावर दुर्दैवी घटना; अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृतदेह रस्त्याकडेला!
Leopard Death : खेडले शिवाराजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मादी बिबट्याचा मृत्यू झाला. वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून योग्य कार्यवाही केली.
वणी (नाशिक) : लखमापूर फाटा ते भनवड रस्त्यावरील खेडले फाट्यालगत रस्त्याच्या कडेला आज, ता. १० रोजी सकाळी बिबट्या मादी मृतावस्थेत मिळून आली असून बिबट्या मादीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अहवाल पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांंनी दिला असल्याची माहीती वनपाल पंकज परदेशी यांनी दिली आहे.

