Leopard Rescue
sakal
जुने नाशिक: एकदम नजरेसमोर बिबट्या उभा राहणे म्हणजे जीव त्याच्याकडे सोपविण्यासारखेच. असाच काहीसा प्रकार निकम कुटुंबीयांबरोबर घडला. चक्क बिबट्या त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या घरात येऊन धडकला आणि त्यांची बोबडी वळाली. जणू त्यांचे काळीज तोंडाशी आणि आता सर्वच संपले, अशी परिस्थिती निर्माण झाली. पोलिस आणि वन विभागाच्या रेस्क्यू टीमने त्यांची सुटका करीत बाहेर काढल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.