esakal | बापरे! नाशिकमध्ये बिबट्याचा कहर; तीन दिवसात 2 चिमुकल्या ठरल्या भक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या

बापरे! नाशिकमध्ये बिबट्याचा कहर; तीन दिवसात 2 चिमुकल्या भक्ष

sakal_logo
By
विनोद बेदरकर

गिरणारे (जि. नाशिक) : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील वाडगाव साडगाव, नाईकवाडी, आळंदी धरण परिसर, जुने धागुर, मातोरी शिवार, दऱ्यादेवी शेती परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, बिबट्याने ३ दिवसात २ चिमुकल्यांसह शेळ्या कोंबड्या फस्त केल्या. रविवारी (ता.३) सायंकाळी बिबट्याने पळविलेल्या ५ वर्षाच्या ऋतिका शिवा वड हिचा अजूनही तपास लागलेला नाही. केवळ फाटलेले, रक्ताललेले कपडे आढळले.


रविवारी रात्री साडे आठला बिबट्याने ऋतिका हिला उचलून नेले. सोमवारी (ता. ४) सकाळी मानेपासून तर कमरेपर्यतचा सगळ शरीर फस्त केलेल्या स्थितीत सापडला. हात आणि कमेरेखालून पायाचा भाग तर डोक्याचा काही भाग अशा स्थिती मृतदेहाचा दुपारी पंचनामा करण्यात आला. यापूर्वी नाईकवाडी येथील पिंगळे परिवारातील युवा शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. या वाढत्या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थांत संताप आहे.

वनविभागाने स्पेशल फोर्स तैनात करून बिबट्याला पकडावे अन्यथा मोहीम हाती घेऊ. होईल त्या परिणामाला वनविभाग जबाबदार असेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. नाशिकच्या गणेशगाव (वाघेरा) माळेगाव वन डोंगर, साप्ते वनक्षेत्र, हरसूल घाट, बोरगड, रामशेजच्या वनक्षेत्रात वनव्याने जंगल जळाले. त्यात वन्यप्राणी जिवाने गेले, काही वाट मिळेल तिकडे पळून गेले ही परिस्थिती बदलत नाही. वनवामुक्त अभियान कागदावर आहे, , बिबट्याला भक्ष्य मिळणे दुरापास्त झाले तर डोंगरात नैसर्गिक गुहा व पाण्याचे पाणवठे राहिले नाही. अनेक ठिकाणी पाणवठे साकारले मात्र निष्कृष्ट कामाने त्यात पाणी राहत नाही. याबाबत वनविभागाकडून काहीही उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी आहे.

हेही वाचा: नाशिक : उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ


वाडगाव, धागूर, आळंदी धरण, मातोरी शेत शिवारातील बिबट्याचा, रान डुकरांचा कहर बघता वनविभागाने जबाबदारीने वन्यप्राणी रक्षण व बिबट्याला जेरबंद करून दूरच्या जंगलात सोडले पाहिजे.
- शिवाजी धोंडगे, पर्यावरणप्रेमी

वनाचे, वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, तसेच वस्ती जवळील जंगलांना संरक्षक कुंपण उभारून मानवी वस्ती शेतीचे शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे. यासाठी वनमंत्री वनविभागाने प्रयत्न करावे.
- राजाराम कसबे, शेतकरी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी व मजुरांच्या २ मुली मृत झाल्या, रात्री- बेरात्री भीती असते. रात्री वस्तीवर लोडशेडिंगमुळे अंधार असतो. बिबट्याच्या हल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी कसे जगायचे?
- सतीश कसबे, शेतकरी.

हेही वाचा: नाशिक : लसीकरणासाठी सुरवातीला बोंबाबोंब, आता केंद्रे ओस

loading image
go to top