esakal | नाशिक : उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ; मिळाला 3,771 उच्चांकी भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Onion Price

नाशिक : उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ

sakal_logo
By
भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून संततधार, तर कधी मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा खराब होत असल्याने मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात गत सप्ताहाच्या तुलनेत एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सोमवार (ता. ४) कांदा शेतीमालाची तीन हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी एक हजार ५००, जास्तीत जास्त तीन हजार ७७१ व सरासरी तीन हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

मागील काही महिन्यांपासून कांदा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली होती. परंतु गत सप्ताहापासून कांद्याचे बाजारभावात वाढ होत आहे. बाजारभावामध्ये वाढ दिसत असली तरी शेतकऱ्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या कांद्यावर बदलत्या वातावरणामुळे परिणाम होऊन त्याच्या वजनात आणि प्रतवारीमध्ये कमालीची घट येत असल्याने वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होताना दिसत नाही. देशांतर्गत व परदेशात महाराष्ट्रातील कांद्यास मागणी वाढल्याने कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे. बाजारभावात सुधारणा झाली असली तरी चांदवड बाजार समितीच्या आवारावरील शेतीमालाची आवक स्थिर आहे.

हेही वाचा: नाशिक : लसीकरणासाठी सुरवातीला बोंबाबोंब, आता केंद्रे ओस

शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल प्रतवारी करून मोठ्या प्रमाणात चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे आणि सर्व संचालक मंडळाने केले आहे.

हेही वाचा: धुळगावचे सुपुत्र जवान सचिन गायकवाड अनंतात विलीन!

loading image
go to top