Leopard
sakal
देवळाली कॅम्प: मागील काही दिवसापासून नाशिक शहराला लागून असलेल्या लोहशिंगवे, वंजारवाडी, नानेगाव आदींसह इतर गावात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. यामुळे दारणा नदीकाठचा भाग जणू बिबट्याचे माहेरघरच बनले आहे असे चित्र तयार झाले आहे. येथील ग्रामस्थांना दररोज बिबट्याचे दर्शन घडत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. दररोज कुठेना कुठे बिबट्याचे दर्शन, हल्ला आदी घटना घडत आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.