इगतपुरीत बिबट्याची दहशत कायम; आतापर्यंत तब्बल 12 बळी

leopard
leopardesakal

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यात १४ महिन्यांत म्हणजेच एप्रिल २०२० पासून ते जून २०२१ या कालावधीत बिबट्याने आतापर्यंत तब्बल १२ बळी घेतले आहेत. यामध्ये एकट्या इगतपुरी तालुक्यात बिबट्याने हल्ल्यात सहा बळी घेतले असून, वर्षभरात जवळपास १५ जणांवर हल्ले केले आहेत. यात दहाजण गंभीर जखमी केलेले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव गुरे, वासरे, शेळ्या, मेंढ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.

(Leopard-terror-in-igatpuri-taluka-marathi-news)

नैसर्गिक परिसंस्थेचा ऱ्हास अन् काळाकुट्ट अंधार

जून २०२१ मध्ये बिबट्याने पुन्हा इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. खेडभैरव ग्रामपंचायत हद्दीतील काननवाडी शिवारातील गौरी गुरुनाथ खडके या तीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याने जीव घेतल्याची घटना ताजी आहे. अद्यापही संबंधित बिबट्याला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरले आहे. बहुतांश हल्ले हे वन विभागाच्या हद्दीत डोंगराळ भागात वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांवर झाल्याचे दिसून येते. या ठिकाणी आजही वीज पोचली नसल्याने अंधारमय वातावरण व डोंगराळ घनदाट झाडेझुडपे, जंगल परिसर याचा वन्य प्राण्यांना शिकार करण्यासाठी फायदा होतो. अनेक ठिकाणी मानवाकडूनही मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याने जंगल नष्ट झाले आहे. यामुळे नैसर्गिक परिसंस्थेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. अन्नसाखळी तुटलेली असल्याने मानव- वन्यप्राणी यांच्यात संघर्ष उभा राहताना दिसून येतो आहे. याबाबत वन विभागाकडून महावितरण कार्यालयाला लेखी पत्रदेखील पाठविले आहे.

leopard
'मन की बात'च्या उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट का झाली?

सायंकाळी घराबाहेर पडणे मुश्‍कील

पूर्व भागातील पिंपळगाव मोर, खेड, अधरवड, वासाळी, टाकेद, अडसरे, भरवीर भागात बिबट्याचा कायम वावर दिसतो. या कारणास्तव अनेक ठिकाणी सायंकाळी सहानंतर झाप वस्तीवरील शेतकरीबांधव घराच्या बाहेर निघत नाही.

यंदा बिबट्यांची गणनाच झाली नाही

तालुक्यात बिबट्यांची संख्या गत वर्षी अंदाजे ३५ ते ४० इतकी होती. या वर्षी कोरोनाचे कारण सांगून गणना झालीच नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या संकटात दोन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी गेल्याने बिबट्याच्या संख्येत हमखास वाढ झाल्याचे दिसून येते. तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवाराला दोन-तीन टप्प्यात १५ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले. दहा लाख डिपॉझिट स्वरूपात, तर पाच लाख रोख स्वरूपात देण्यात येतात. आतापर्यंत सहापैकी वर्षभरात चार परिवाराला साहाय्य प्राप्त झाले असून, दोन परिवारांचे अजून प्रलंबित आहेत.

वन विभागाचा चालढकलपणा

पूर्व भागातील धामणगाव, भरवीर, निनावी, अडसरे, खेड बंधाऱ्यासह कडवा धरणाच्या बाजूचा परिसर, नदीपात्रालगत असलेल्या भागात काळी कसदार जमीन असल्यामुळे या परिसरात नागरिकांना कायम बिबट्याचे दर्शन होताना दिसत आहे. रात्री- अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. अनेक शेतकरी शेतात वस्ती करून राहतात. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावले जातात. मात्र पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून शेळी ठेवली जात नाही. त्यामुळे रिकाम्या पिंजऱ्यात बिबट्या येत नाही. त्यामुळे वन विभागाचा चालढकलपणा अनेकवेळा माणसांच्या जिवावर बेतला आहे.

leopard
'शर्यत' बंदीमुळे आठ वर्षात 42 लाख बैलांची कत्तल

घटनाक्रम : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी

१) भोराबाई आगिवले (रा. चिंचलेखैरे), वय ६०, ७ ऑगस्ट २०२०

२) कान्हू धुपारे (रा. करुंगवाडी), वय ७०, ११ ऑक्टोबर २०२०

३) जया चवर (रा. अधरवड), वय ३ , १२ नोव्हेंबर २०२०

४) कविता मधे (रा. पिंपळगाव मोर), वय ६, १९ नोव्हेंबर २०२०

५) बुधाबाई चंदर आघाण (रा. शिदवाडी), वय ६०, ३ एप्रिल २०२१

६) गौरी गुरुनाथ खडके, (रा. खेड), वय : ३, २३ जून २०२१

एका वर्षातील हल्ले

- अधरवड येथील वनमजुरावर हल्ला

- अडसरे येथील युवकावर हल्ला

- वासाळी येथे कुत्र्याची शिकार

- घोडेवाडी शिवारात लहान मुलांवर हल्ला

- भरवीर येथे वासरू ठार

- घोरपडे मळा परिसरात पाच शेळ्या फस्त

- खेड येथे बिबट्याचा हल्ला

(Leopard-terror-in-igatpuri-taluka-marathi-news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com