esakal | नाशिक : सामनगांवरोड परिसरात बिबट्याचा दिवसाढवळया वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

bibtya(leopard)

नाशिक : सामनगांवरोड परिसरात बिबट्याचा दिवसाढवळया वावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक रोड : सामनगांव रोड आश्विनी कॉलनी परिसरात दिवसाढवळ्या शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान गोकुळ अस्वले यांना बिबट्याने (Leopard) दर्शन दिले आहे. त्यांनी भर वस्तीत बिबट्याच्या वावर करतानाचा व्हिडीओ काढला आहे. परिणामी परिसरात भितीचे वातावरण आहे.

परिसरात रेक्सू ऑपरेशन राबविण्याची गरज

नाशिक रोडच्या पुर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वनविभागला बिबट्या जेरबंद करण्यासाठी अपयश येत आहे. सदर बिबट्या माणसाळेले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ले करून ठार केल्याच्या घटना घडल्या आहे. मात्र शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान येथील गोकुळ अस्वले कामानिमित्त जात असताना अचानक त्यांच्या दुचाकी समोर बिबट्या पळाला मात्र अस्वले यांनी धिर धरत सदर बिबट्याचा व्हिडीओ मोबाईल मध्ये काढला. मात्र अस्वले मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले होते. बिबट्याने परिसरातील ईरीनकडे (IREEN) पलायन केले. ईरीन परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने बिबट्याचे वास्तव या ठिकाणी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी वनविभागाने याकडे लक्ष देत रेक्सू ऑपरेशन राबविण्याची गरज असल्याची मागणी प्रभागाचे नगरसेवक संतोष साळवे, पंडित आवारे सोसायटीचे चेअरमन सूदाम बोराडे, माजी चेअरमन केशव बोराडे, गोकुळ अस्वले, महेश गायकवाड, योगेश भोर, आदी यांनी केली आहे.

हेही वाचा: उत्पादन देशी अन् नाव मात्र परदेशी! भारतीय संशोधकाची खंत

हेही वाचा: नाशिक-पुणे महामार्गावर जीवघेणे खड्डे; प्रवासी त्रस्त

loading image
go to top