बिबट्याला कुत्र्याने काढले वेड्यात! शिकारीचा हव्यास 'त्या' बिबट्याला पडला महागात 

Leopards seized in an attempt to hunt a dog nashik marathi news
Leopards seized in an attempt to hunt a dog nashik marathi news
Updated on

काळूस्ते (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारात मंगळवारी (ता.५) गांगडवाडी येथे कुत्र्याच्या शिकारीसाठी धावताना बिबट्या एका झोपडीत शिरला, आता शिकार सापडली असं वाटत असतानाच विपरीत घडलं अन् शिकारीचा हव्यास बिबट्यालाच महागात पडला.. नेमके काय घडले वाचा

कुत्रा वाचला अन् बिबट्या फसला

वैतरणा मार्गावरील पिंपळगाव भटाटा हद्दीतील गांगडवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास कुत्र्याला भक्ष्य करण्याच्या प्रयत्नात कुत्र्याच्या मागे धावत असताना बिबट्या दरवाजा उघडा असलेल्या गोविंद हिंदोळे या इसमाच्या घरात शिरला. या वृद्धाच्या ही बाब लक्षात येताच त्याने झोपडीचे दार लावून घेतले. यामुळे बिबटया झोपडीत अडकला. याच झटापटीत कुत्रा मात्र झोपडीच्या दरवाजाला असलेल्या फटीतून अलगद निसटला व बिबट्याच्या तावडीतून वाचला. त्यामुळे बिबट्याची अवस्था ‘कुत्र्याने काढले, बिबट्याला वेड्यात', अशी झाली होती. जंगलात आपले संचारक्षेत्र असले तरी कुत्र्याच्या शिकारीचा हव्यास महागात पडला. कुत्र्याच्या मागे धावताना झोपडीत फसला. बिबट्या आत अन कुत्रा बाहेर. अखेर सायंकाळी साडेआठ वाजता बिबट्या पिंजऱ्यात गेला.  

सलग पाच तास रेस्क्यू ऑपरेशन

वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करीत असतानाच अडथळे निर्माण होत होते. यात अंधार झाल्याने प्रश्न गंभीर होत होता. दरम्यान, झोपडीच्या दरवाजलाच पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याचवेळी झोपडीत फटाके फोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न होते. अखेर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबटया पिंजऱ्यात फसला. सलग पाच तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. या प्रयत्नात जिल्ह्याचे सहायक वनसंरक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मार्गदर्शन केले.

अद्यापही बिबट्या मादी या परिसरात असल्याची चर्चा

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त केली. अखेर पाच तासानंतर झोपडीच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात आला. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच वनविभागाने व ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, अद्यापही बिबट्या मादी या परिसरात असल्याची चर्चा आहे. रेस्क्यू ऑपरेशन प्रयत्नात इगतपुरीचे वनअधिकारी रमेश ढोमसे, वनपरिमंडल अधिकारी भाऊसाहेब राव, दत्तू ढोन्नर, वनरक्षक जाधव, मनीषा सोनवणे मुज्जूभाई आदींनी परिश्रम घेतले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com