Nashik News : अधिकारी घडविणारी अभ्यासिका धूळखात; 4 वर्षापासून बंद अवस्थेत

closed library at cidco
closed library at cidcoesakal

Nashik News : सिडको विभागीय कार्यालयातील श्री. शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ संचालित अभ्यासिका गेल्या चार वर्षांपासून धूळखात पडून आहे. या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आजपावेतो ७० प्रथम श्रेणीचे अधिकारी तयार झाले आहेत.

तर सुमारे ३०० विद्यार्थी सरकारी नोकरीस रुजू असल्याचे समजते. ही अभ्यासिका १८ ते २० वर्ष सातत्याने सुरू होती. मात्र चार वर्षापासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (library make officers in dust Closed since 4 years at cidco Nashik News)

सिडको परिसर हा प्रामुख्याने कामगारबहुल परिसर म्हणून संबोधले जातो. विद्यार्थ्यांना घरी राहवून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे खूप अवघड असल्याने अनेक विद्यार्थी नाममात्र दारात उपलब्ध असलेल्या श्री. शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ संचालित अभ्यासिकेत येत असतं.

चार वर्षापासून केवळ भाडेवाढीच्या कारणास्तव बंद असलेल्या अभ्यासिकेतून मनपा प्रशासनास मिळणारा महसूलदेखील बंद आहे. यामुळे भाडेवाढ करूनही हा तोटा भरून निघेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या अभ्यासिकेत एकूण १५० विद्यार्थी अभ्यासासाठी येत असायचे. मनपा प्रशासनाने किमान महसूलामध्ये शहरातील इतरही बंद असलेल्या अभ्यासिका सुरू करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून जोर धरू लागली आहे.

तर थोड्या पैशांसाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असलेल्या गंभीर बाबीकडे स्वतः आयुक्तांनी लक्ष द्यायला हवे, असेही विद्यार्थ्यांमधून बोलले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मनपाचे नुकसान

एका वर्षात अभ्यासिकेतून वार्षिक भाड्यापोटी मनपा प्रशासनास लाखोंचा महसूल मिळत होता. कोरोनाकाळात अभ्यासिका अशाही बंद असल्या तरी अडीच वर्षे प्रमाणे मनपा प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अजूनही किती तरी वर्षे अभ्यासिका बंद राहिल्यास हे नुकसान मोठ्या प्रमाणावर वाढणार असून या बाबीकडे गांभीर्याने बघितल्यास अशा वास्तू पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. अभ्यासिकेतून अनेक गरीब घरातील विद्यार्थी पास होऊन बडे अधिकारी झाले आहेत.

शिक्षणासाठी मनपा प्रशासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे असताना मात्र काही पैशांच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांचे नुकसान तर होतच आहे, मात्र मनपाचेही नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून करण्यात आला आहे.

"सदर प्रकार न्यायप्रविष्ट असून मी सिडकोतील पहिली अभ्यासिका सुरु करताना त्यातून पैसे कमविणे हा हेतू नव्हता. सिडकोच्या घरांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अशक्य होते. कुठे एकांत मिळेल या दृष्टीने अभ्यास करताना अडचणी लक्षात घेऊन अभ्यासिका सुरू केली होती. आज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून पैसे घेणे योग्य नाही. चढा भाव देऊ शकत नाही."

- मामा ठाकरे, माजी नगरसेवक

"अभ्यासिका सद्यःस्थितीत बंद असून, ज्या कोणासही अभ्यासिका चालवायची असेल अशा व्यक्तींनी रीतसर मिळकत विभागास अर्ज करून कागद पत्राची पूर्तता करावी. यासाठी नवीन भाढेवाढीप्रमाणे भाडे आकारण्यात येईल."

डॉ. मयूर पाटील, विभागीय अधिकारी, सिडको कार्यालय

"मीदेखील या अभ्यासिकेत अभ्यासासाठी आलो आहे. अभ्यासिका पूर्ववत चालू झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता चालना मिळण्यासाठी मदतच होणार आहे. भाढेवाढीचा मुद्दा खोडून काढल्यास कदाचित अभ्यासिका पूर्ववत सुरु होईल. मनपा आयुक्तांनीच या बाबीकडे जातीने लक्ष द्यावे ही विनंती." - अजिंक्य गिते, वकील

"तीन-साडेतीन वर्ष अभ्यासिकेत अभ्यास केला. एमपीएससीच्या माध्यमातून राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली असून, राज्यसेवेचीदेखील परीक्षा दिली आहे. त्यातूनही वर्ग एकचे पद मिळण्याची शक्यता आहे. हे सर्व अभ्यासिकेमुळे शक्य झालं."

- अमर दोंदे, राज्य कर निरीक्षक

"मीदेखील या अभ्यासिकेत ३-४ वर्षे अभ्यास केला आहे. या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनात काम करत आहेत. अनेक विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट झालेले आहेत. अभ्यासिका सुरू झाल्यास नवीन नाशिक सारख्या कामगार वसाहतीतून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करू शकतील. त्यामुळे ही अभ्यासिका सुरू होणे गरजेचे आहे."

- सागर हांगे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com